भावकी: भाग २
मागील भागावरून पुढे...
शेवंता - " आवं मालक, परवाच तर शेजारची वैशी पाठवली होती की तुमच्याकडं. कुनाकड नजर बी वर करून न बघणारी ती वैशी बऱ्याच मिनितवारी करून इकडं आणावी लागली. "
शेवंताच्या तोंडचे हे शब्द ऐकून अनिताला आश्चर्याचा धक्काच बसला. वैशालीला ती एक शालीन, चारित्र्य आणि पतिव्रता बाई समजत होती. पण आज तिच्याबद्दल हे सगळं ऐकून अनिताला आश्चर्य वाटत होते.
विलास - " ते नवं पाखरू आन की येक डाव हिकडं. "
शेवंता - " कोण अनिता ? "
विलास - " व्हय व्हय, तीच ती राजाची बायकु...! कधी एकदा तिला आवळतूय असं झालंय. नुस्ती नागीण हाय. राजा बी तिच्याकडं लक्ष देत नाय असच दिसतया. "
शेवंता - " व्हय मालक....! कवळीत येईल ती तुमच्या असं वाटतंय. आ व मी मी म्हणणाऱ्या बाया तुम्ही वाकिवल्या. त्यात ही अनिता काय चीज."
विलास - " व्हय...! वाकिवतो तिला बी. तु जरा तिला भुलव. गोडी गुलाबीन इकडं आन तिला. पैश्याच गाजर दाव म्हंजी येईल बग ती. "
शेवंता - " काळजी करू नगा मालक. दोन दिसात अनिता तुमची असल. मग भोगा तुमि तिला. पाहिजे तसं. पण आता जरा आवरत घ्या. अंधार पडलाय. घरी नवरा, लेकरं वाट बघत असतील. "
विलास - " दम खा माझी राणी. हा झालं. "
दोघांचे हे संभाषण ऐकून अनिताला दरदरून घाम फुटला. आपल्याबद्दल हे असं ठरत असल्याचं तिच्या खिज गणतीत देखील नव्हत.
विलास आणि शेवंताचा प्रणय आता संपला होता. दोघांची आवराआवर सुरू होती.
अनिता तिथे क्षणभरही न थांबता तिथून घरची वाट लगबगीने चालु लागली.
क्रमशः
Comments
Post a Comment