Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

तृप्ती (भाग: द्वितीय)

  तृप्ती  (भाग: द्वित्तीय आणि अंतिम) या बाजूने जरी तो हॉल वाटत असला तरी तो हॉल नव्हता. तो स्वामींग पूल होता. त्याच्या तिन्ही बाजूंनी पंधरा ते वीस फूट उंच भिंती व भिंतीपलीकडे पुन्हा सुरु नारळ आणि पोफळी! समुद्रकडील बाजू उघडी. आत गेल्यावर डाव्या बाजूला काही छत्र्या व त्याखाली टेबल खुर्च्या आणि बीचवर असतात त्या प्रकारच्या खुर्च्या होत्या. उजव्या बाजूला दोन तीन खोल्या आणि पुढे काही शॉवर होते शॉवरच्या पलीकडे पुन्हा काही खोल्या होत्या. ती आत येईपर्यंत तो कुठेतरी गायब झाला. ती त्याला इकडे तिकडे शोधू लागली पण तो तिला कुठेच दिसेना. शॉवरच्या पलीकडे असणाऱ्या एका खोलीतून तिला पाण्याचा आवाज आला. तिने आवाज न करता हळूच दार ढकललं. ती बहुधा स्त्रियांची शॉवररूम होती. आणि त्यातल्या एका शॉवरखाली तो डोळे मिटून स्तब्ध बसला होता. त्याने फक्त स्विमिंग शॉर्ट घातली होती. त्याच्या सर्वांगावरून पाणी वाहत होते. त्याचे शरीर कपड्यातून जेवढं दिसतं त्यापेक्षा कितीतरीपट आकर्षक होतं. त्याचा प्रत्येक स्नायू जणू कोरून काढला होता. त्याचे खांदे, छाती, पोट, दंड सगळंच अगदी आखीव! त्याच्या पिळदार शरीरावर असणाऱ्या असंख्य...

तृप्ती (भाग: प्रथम)

कथा: तृप्ती भाग: प्रथम  रोजप्रमाणे त्याचा पोफळीतल्या टपरीच्या बाजूला दोन स्टूल घेऊन चहा आणि सिगारेटचा कार्यक्रम चालू होता. शांत व स्वच्छ समुद्रकिनाऱ्यामुळे आणि घण्टेश्वराच्या टुमदार मंदिरामुळे गावात पर्यटकांची संख्या जरी वाढू लागली असली तरी तसं गाव मागासलेलंच होतं. शहरात मोठ्या हॉटेलांमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी करून चांगला पैसा कमावून एक छोटेखानी पर्यटक निवास त्याने इथे चालू केला होता. उत्पन्न खूप नसले तरी त्याचं बरं चाललं होतं. तो गावात हळूहळू सुधारणाही करू लागला होता. सुशिक्षित, शहरात राहून आलेला आणि इतरांच्या मानाने बराच सधन असल्यामुळे गावात त्याला बऱ्यापैकी मान होता. सकाळी सात वाजल्यापासून ते साडेदहा अकरा पर्यंत तिथे गावातल्या लोकांशी उगाच गप्पा मारायला बसत असे आणि चहा आणि सिगरेट ओढत असे. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना जवळपास असणाऱ्या पण जास्त प्रसिद्ध नसणाऱ्या पर्यटन स्थळांची माहितीही देत असे. त्याच्या पेहराव व एकूणच व्यक्तीमत्वामुळे तो या गावातील नाही हे पाहताक्षणी कळायचं! आजही नेहमीप्रमाणे त्याचा सकाळचा कार्यक्रम चालू होता. तेवढ्यात एक मोठा टेम्पो येऊन टपरीसमोर थांबला. समोरून उत...